कारभारी मारतीना पार वर बसना तशा खोडगाव वाला जगू भो,धनाभो , खेपा तात्या, रायसिंग भो उनात ! पिरनभो आज कथा नयकेलं व्हतात, मालूम नही !
मंडई ले दखीसन कारभारी ले याद उणा , आज दिम्मयं ले विक्की बाबाना वाळदिवस शे , त्यानं कुरता बरेड मा जावांन शे! चंबळ मा गयतात तवय खेपा तात्या आणि रायसिंग भो ले लयी नही गयतात त्यामा त्या मुकला दिन रागी भरेल व्हतात ! आज ते संगे लईज जाणं पळी म्हनीसन कारभारी बी तयारी मा व्हता !
तशा कारभारी आणि मंडई बरेडमा जावाले निंघनी ! वाटमा फुलस्ना गुचछा लीना ! गाडी भिन्नाट निंगणी ! बाबा ले भेटनी , सत्कार करा , गोलगप्पा व्हयन्यात ....रात व्हवाले लागणी तशी मंडईनी बाबाना निरोप लीना नी परत उबगेलवाडीकडे निंगणात ! रायसिंग भो ना पोटमा हाड्या कोकावाले लागणात ! घळिक भर बी जुवान दम माराल तयार नयी व्हता !
बाम्हणे गये नी मंडई एक ढाबा वर खावलाले बठनी! चेंदता चेंदता गप्पा सुरु पडण्यात....खेपा तात्या म्हणे ,''कारभारी, सकाय ले तुमले हाक मारी पण तुमे भिनाट फटफटी शेपाली लयीग्यात ! "
कारभारी म्हणे ," तो एक लब्बाड ना पाठलाग करी रायंतु, पण सापडना नही तो नेमाड्या !"
खेपा त्यात्या , ''कोणा हो ? काय व्हयी गयथं?"
जगू भो म्हणे," अं, त्यामा कारभारी तुमेन आज जरसा संतापमा दखाइ रायणतात , जाऊ द्या आम्ले ती टोरी सांगा ."
कारभारी म्हणे ,''काय व्हयंन , रोज नी मायक आमेन सायमा चालनू व्हतूत ,तवसामा एक गाळी वाला आम्ले कट मारीसन जोरमा पुळे पयना ! .... तिनी आंडेरणा मारू त्यानी तो सेकंड हॅन्ड गाळी वाला डेडोर थाम्बणा नही , नही ते तो होबाळामा खाता , त्या सरमफोक ले सोळाव नयी मी ! "
"व्हतं तेन बय! अशा का ?," रायसिंग भो पापड उचलता उचलता बोलना . बोलता बोलता आख्खा पापड सराई टाका बहाद्दर नी !
कारभारी म्हणे ,"मंग भो , तुमना आऊ कारभारी गाडी वरतुन फाफलायी चालना व्हता. थोडकामा वाचना . आमेन त्याना मांगे गाळी घोमाली पण त्यानं दिनं धिंडोयं मारू त्यानी , ते सैराट गाळली पुळे हेंडाली लयी गये ! "
जगू भो , "अशा का ? कोण व्हता तो बाटोळ ? नंबर बिंबर टिपा का नही ?
कारभारी म्हणे ,''त्या येडी चलींदरनी गाळी वर इथला फफोटा व्हता कि त्यांना नंबर दिखना नही ! अशीज दखायनं एक चक्कर वालं ! त्यानं दीना त्यानी ....अक्कल ना मक्कल ,फाटेल चप्पल , तुटेल बक्कल, दाटायल डेडोर ,डोकसावर टक्कल ....सर्कस वालासनी करतस नक्कल , जशा रस्ता त्यास्ना बापना शे सालासना !!! "
जगू भो म्हणे , "खुशाल कारभारी ले कट मारी गया !!!! त्यानं आते खरं नही....एक दिन तो भिडू सापळी म्हणजे सापळी, दखसुत त्यानी नाळ ! कारभारीना डोकामा गया त्याले कारभारी सोळत नही !"
कारभारी म्हणे , "बराबर जगू भो, आपला डोकामा उना त्याले आपुन अज्याबात सोळतस नहीत ."
खेपा तात्या म्हणे , "या आतेना वल्ला वल्ला चोरेल दपाळेल धनवर नी बापनी कमाई वर धूम करणारा लोके उजी जोरमा गाड्या तंगांडतस! त्यानं बय त्या ते सोताना जीव धोकामा घालतंस पण दुसराना बी जीव ले धोका करतस. आते मंगलसिंग सायेब नी याद येस लोकेस्ले ! मस्त कडक करेल व्हतं सायेब नी !"
जगू भो म्हणे ,"उजी तराळा व्हता सायेबना !"
रायसिंग भो म्हणे ," हा ना हो , या पोरेसले त्यास्ना माय बाप बी सांगतस नहीत का ? कीतल्या हेंडालतस त्या गाड्या ?"
"शिलगोत बिचारा , सकाय मरतीन , त्या आज का मरेतनात !, आपला काय बापनं जास ! त्यास्ले नही प्यारा आपला जीव ते कसाल करतस त्यास्नी कीव? , चला उठा आते !", कारभारी नी बोलता बोलता हाथ धोया !
प्लेटा कोल्ल्या व्हयन्यात तशा गप्पा बी सरण्यात , जगू भो नी पयभारे बिल दी टाकं. बील देवाई जावामुये रायसिंग भो जाम खुस व्हता ! मंडई बळीसोप खायीसनी उठनी नि गाळीमा बठनी ! कारभारीनी गाळीले शेल मारी ! धमाने, चेलने, येरदेल ,शिंदखेळ नी सुकेद ना पूल वंडालत गाळी मुक्काम ना गम पयाले लागणी , जगू भो ढाबा वरतून खिसामा बळीसोप भरी लयेल व्हता...गाळी मा खुसुर खुसुर खायी रायणता ! खेपा तात्यानी जगू भो नी मज्या लिनी ! गप्पा बदलण्यात जगू भो ना गब्बर ना संग काढेल शेल्फी नि गंमत सांगी , खेपा तात्या खेपा मारत मारत हसाल लागणात ! रायसिंग भो ले रायरंग नि गम्मत उजी आवडणी ! तशी वाटमा गाव लागणं! मंडई नी टाटा बाय बाय करा .... कारभारी भी घर ना गम परतना, बरं मंडई , रात व्हयी गयी....पडा आळा !
लेखक : आपलाच दोस्तार: जयपाल सर , (वाठोडा) हल्ली मुक्काम -शिरपूर (copyrighted material of Shri Jaypalsingh Girase)

No comments:
Post a Comment