जगू भो शी शी टीवी कॅमेरा न दुकान खोली रायणात त्यामा हल्ली त्यास्नी भेट बिर्ला व्हयी जायेल शे ! सुरत वाला रवी शेठनी कारभारीनागत ''मूछ'' वाळावण ठयरायेल शे , कोणी कुयीक लागाल नको म्हनीसन सध्या घरना बाहेर निंघतस नयित! फारमवाला दानू शेठ बी सध्या पिल्ला दखी दखी खुस शेत ! दिनभर ''इस्कुन्दा --फारदा --नारदा --पिल्लारदा'' नी रिंग टोन वाजाळी रातस ! कामेसनी रोज बातळ-बातळ मा कारभारीले बी आपली दिवटी आणि घर मा टेम भेटत नयी ! बाकी असामीसले काय कारभारीना याद येत नयी ! कामापुरता याद करणारसनी कारभारी बी जास्ती फिकीर करस नयी ! सणवार ले कारभारी सयसांजे बठेल व्हतात नी तवसुंग बुलेट ना ढब ढब आवाज उणा ! रायसिंग भो ,धना भो आणि दीपा भो कारभारिले भेटाले उनात ! रायसिंग भो सोना फॅक्टरी माईन काल्दीस्ना दपाळेल पेपर लिसन उनात ! येताज बरबर दगोळ वर टेकं! खिसा माईन चोया-मोया व्हयेल पेपर काळा ! रायसिंग भो म्हणे ,''कारभारी , या रोहिंग्या लोके आपला देस ना गम येवान म्हणी रायणात , तेन बय, काय दांगडो शे भो आऊ !"
कारभारी म्हणे , ''खोडगाव--हातोडा'' येरायेर ले भिळू भिळू करी रायणात ! आठे तुमना दांगडो मिटत नयी ! गर्दी इतली व्हयी जायेल शे कि रोज ''भावी --भावी '' म्हनीसन समाधान मणी लेन पळस ! जगू भो हम्मेस फुलायी फालायी फय खायी रायणा , त्यामा धना भो ना जीव बयस! आखो या रोहिंग्या आठे पादळायनात तें भावी सप्पन चूर चूर व्हयी जातींन ! ''
धना भो म्हणे ,''कारभारी ,काय दांगडो शे आऊ रोहिंग्यस्ना !"
रायसिंग भो म्हणे ,''दखा कारभारी , आऊ धना भो ले तराजू आणि तुपणा शिवाय काहीज माहित रात नयी ! यासले देसमा काय चालू शे यांनी खबर बात नयी रास !"
धना भो बी खिजी उठनात ,''हा रे भो ,तुमी हातोडा वालासले उजी देसनी खबर रास ! काल्दीनं उबगेल गुरुप वर रोहिंग्यासनी एक पोस्ट व्हती तेना खाले बी रायसिंग भो नी ''vary naice '' लिखेल व्हतं ! इंग्लिश न्या पेलिंगासमा कीतल्या मिस्टिका रातीस तुमन्या !
धना भो नि आयी कमेंट वर दीपा भो पोट धरी धरी हासनात ! रायसिंग भो सरमाई गयात ! तरी बी आपली मजारमा बोलानी सवयनुसार दीपाभो बोलनात: "कारभारी , आऊ काय दांगडो शे त्यांना बारामा सांगा आम्ले !"
कारभारी म्हणे : ''रोहिंग्या बिहिंग्या लोकेस्नी त्यास्ना म्यानमार देसमा हागणखळी माताळी आणि तठेन ढोपरमा लाथ बठनी ते त्या आपला देसमा घुसाना करता धडश्या मारी रायणात ! त्यास्ले म्हणा तथाज शिलगा ! आमना गम आमलेज जागा भेटत नयी त्या येरायेर ले ठोकायी रायणात ! त्यामा यासले इबाक बिबाक अज्याबात पामकूं-बिमकु नका देऊ !''
''व्हतं तेन बय अशी शे का ?", धना भो बोलनात !
''मंग भो , मुकला तरास व्हयी जाई जर त्या आपला देसमा घुसणात तें ! आठे इतली गर्दी व्हयी जायेल शे तें त्यास्ना कथा टिकाव लागी भोस्वनी ! त्यास्ना त्यास्ना देस मा रावो ना त्यास्नी खुशाल ! आपले कसाल उपद्र देवो !,'' कारभारी बोलनात !
तितलामा रवी शेठ ना स्टेट्स दखावर मंडई बोलणी , ''कारभारी ,सध्या मुकला लोके मूछ ठेवाल लागी गयात बरं! रवी शेठ सुद्दा मुच ठेवाल लागी गयात ! ''
कारभारी म्हणे , ''मंग मंडई , मुच तें ठेवालेज जोयजे ! मुच नयी तें कुछ नयी ! आंमणी ऐतिहासिक मूछ दखिसणी जर लोके मूछ ठेवतीन तें मंग ''मूछ जिंदाबाद'' राई !
रवी शेठ ले मूछ ठेवान च्यालेंज देयेल व्हतं कारभारीनी ! पण माणूस जिद्दी शे बरं ! आमले गप लागे पण जुवाननी शिरेस लिसन ,गावठी तूप लायिसन मूछ वाढायी टाकी ! मान्न पळी दिल्लीपतीसले ! आते ती त्यास्नी कापाल नको तेवढी !
का मंडई खोटं शे का ? खोटं व्हयी तें परत ! ''
बठी मंडई हसनी आणि घरेघर नयकनी ! मंग मंडई , तुमी बी काय झाळ ले तरास देतस ? पळा आळा खुशाल !
लेखक : जयपालसिंह गिरासे [शिरपूर] अर्थात आपलाज कारभारी

No comments:
Post a Comment