कारभारी चंबळ ना खोरामा एकडाव जायेल व्हता ! घाट मा चालता चालता एकदम चमकायना ! समोर दखस ते एक दाढीवाला जुवान बंदूक लीसनी उभा ! कारभारीना संगे धना भो व्हता ! खोडगाव वाला जगू भो ते गाडीनी डिक्की मा दपी गया , धना भो म्हणे ,''कारभारी , आते काय खरं नही, बय समोर गब्बरसिंग दखास !"
कारभारी म्हणे ,''आरे आऊ ते गब्बर शे, यां दीना बाटोड मारू यानी , आऊ आजून जित्ता शे ? !"
गाडी उभी रायणी ! तशा गब्बर पुळे उणा ! गाडीना काच खालतं व्हयना .
कारभारी म्हणे ,''बोल भो ,काय लागावं शे ?"
गब्बर म्हणे , ''चुनानि पुळी शे का? जंगल मजार पुळी ना टाया बठस नही !घाबरू बिबरु नका , मी तुमले काहीज करावं नही ! सरावनं चालू शे त्यामा लुटमारी बंद करेल शे ! पण तल्लप लागेल शे !"
कारभारी म्हणे , '' दख भो आमणी गाळीमा पुळी पाळी काय नाही बरं! पण गुल्या पान वाकळी सोपारी शे , गुल्या ,सोगळी भर वाकळी खावाड या जिभो ले !''
गब्बर डोकं खाजाले लागी गया , ''आयी वाकळी काय रास?"
गुल्या म्हणे ,'' खायी ते दख! मंगा भो नी टपरी वरतून बांधेल शे !"
तवसून जगू भो भी डिक्की मायीन बाहेर उणा नी खुशाल शेल्फी काढाले लागणा! गब्बर म्हणे ,''ओ भो , आयी काय करी रायणा ?"
जगू भो म्हणे , '' शेल्फी ली रायणु , मंग फेसबुक वर ,व्हॅट्स अप वर टाकसू ! तुमे फेमस व्हावी जाशात!"
गब्बर, ''दख भो , अशी काय करीस बिरीस नको ! पोलीस लोके मना मांगे लागी जातीनं! जेल माईन सुटावर आते धयड पणे काम व्हतं नही म्हणीसं आऊ धंदा धरा आखो ! लोकेस्नी मना नावावर मुकला पैसा कमायात नी माले आज आऊ दिन दखाले भेटी रायणा! "
कारभारी , " गब्बर भो , तुंना बाकी लोके , घोडा कथा गयात ?"
गब्बर , ''काय सांगू मना हाल ! घोडला नी मानशे परवडतस नहीत. त्यामा एखला दिन काळी रायणु भोस्वन!आणि ज्या बल्लास्मा आमेन आमना अड्डा बनायेंल व्हता तठे आते पिरन पिसलीया ठेकेदार नी स्टोन क्रेशर ना मशीन उभा करी दिनात ! मंग आते आम्ले वनटे-घंटे दपत फिरनं पळस. ''
सांबा मरी गया , कालिया ना पोरे त्याले फारेन मा लयी गयात ! बाकींना पुढारी बनी गयात ! मना बिचाराना हाल व्हयी गयात !बाकी लब्बाडसनी मी जेल मा जायेल व्हतु त्याना फायदा उचला , बंदुका भंगारमा इकिसन पयी गयात ! नही ते पयले पन्नास पन्नास कोस लुगा पोरे रळेत ते त्यास्नी माय मनं नाव लेये, आऊ दरारा व्हता आमना ! नी आते कुतल्ल बी घाबरस नही आम्ले ! "
कारभारी म्हणे ,'' हा ना हो , काय थाट व्हता तुमना ! आमना जगू भो आज बी ते मेहबूबा मेहबूबा गानं घळी घळी दखस!"
जगू भो म्हणे , "मना मोबाईल मा ती रिंगटोन फिट करेल शे ,कारभारी"
कारभारी म्हणे , ''गब्बर भो , तुमे निवडणूक लढा नी निवडी या , मंग हयात भर पेन्शय भेटस बरं! आमना फडणवीस भाऊ नी बठासण्या पगारा वाढायी दिन्यात ! आराम कराना नुसता ! ''
गब्बर म्हणे , '' तेच कराना इचार शे आते , त्यांना शिवाय चारा नही ! पण आमना एम पी मा उजी पवाडा शेतस , आठे पुढारी ले बदनाम करी टाकतस! मी फाम भरा ते इरोधी पार्टी वाला बसंती ले मनासमोर उभा करतीन नी माले पाळी ताक्तीन! "
कारभारी म्हणे , ''मंग अशी कर , शेवट लुगा नाव समझू देवाण नही ! अशी काय बी चाल खिळूत ! नयी ते माले सांगा। .. बसंतीनी आणि कारभारिनी वयक शे !"
गब्बर म्हणे , '' चाली , माले तुमना नंबर द्या , मी फोन करसु तवय कायतरी करूत ! ''
टाटा बाय बाय व्हयना, धना भो नि गाळी पुळे काळी ! वाटमा एक ढाबा लागणा , च्या ढोसलाना करता गाळी थांबाडी. व्हटेल वाला ले गब्बर नी बात सांगी. तो हसाल लागणा . तो म्हणे , '' तो रायरंग शे हो , गब्बर ले जावाले मुकला सालं व्हयी ग्यात!"
कारभारी बी हसाल लागना. जगू भो ले उजी वाईट वाटनं . जगू भो ना बठा पिल्याण हुसकी गयात ! नही ते दोन च्यार हफ्ता वांदा नही राता! कारण आते रायरंग ना संगे काढेल शेल्फी कोणता गुरप वर टाकानी?
----- मुक्काम पोस्ट :ऊबगेलवाड़ी : (C) लेखक : जयपाल सर ,शिरपूर

No comments:
Post a Comment