
आज दिनभर लाईट नबेदा व्हती त्यामा कारभारी आज दिम्मयले ऑनलाईन व्हतात ! थोबाळबुक ना धपाळावर कोठे काय व्हयनं ते झामलता झामलता कारभारीले खोडगाववाला जगू भो ना धपाळावर रायसिंगभो ना फोटुक दखाल भेटणा ! कारभारीनी वाचं नी कारभारीना हाथ-पाय थंडागार पळी ग्यात ! पाणी पळस नयी म्हनीसन जानी दोस्तारना कुळापा कारभारीघाई दखायना नयी ! कारभारीनी लगेज फोन घुमाळा ! फोन दरानेवाला खटा अप्पा ले लागी ग्या ! खटा अप्पा आज तिसरा पार पाईन भंडारा कराले चालना जायेल व्हतात ! कारभारी ले आस लायी दिनी नी येखला उपळी ग्यात ! कारभारीनी मंग त्यास्ना आंगमा वारं येयेल शे म्हनीसन डायरेक जगू भो ले म्यासेज मा सांगी टाकं ---" पूलवर उभा राईसन काय पाणी दिखी का भो ? आणि ढग दखाल वरते दखनं पळस ! कारभारी म्हणे : ''चांदण्या चमकतीन ,ढग गरजतीन ,दमधर रायसिंग या दिन बी सरकतीन !'' भगवानजीवर भरोसा ठेवा ! कारभारीनी जी दिशा दिनी तीवर चाला , जिंदगानी मा उतार चढ इ रास !''
तथायीन जगू भो नी लगोलग रिप्लाय दीना --''तो म्हणे... सरकार भी मारी राहिन आणि देव भी..! नुसता झिर झिर पाणी पाळी सन देवबाप्पा टेस ली रायना ! सरकार बी टेस ली रायनं ! कर्ज माफी न भी अजून नाटकच शे ! अशी चाली ते मंग आमी बुलेट गाळी ले पेट्रोल कशी काय टाकानं ?"
कारभारी म्हणे , ''खरं शे भो ! बजाज डिस्कव्हर वर भाऊनं वजन पळस नयी ! बुलेट परवळाल जोयजे म्हनीसन पाणी पळालं जोयजे ! पण दम ते खावा ! यिन भो पाणी, इतला काय पाणीमा पळी ग्यात ! आखो दोन-च्यार दिन दम खावा ! आपलं सरकार रातं ते टेमवर पाणी पळतं !
जगू भो ना आखो म्यॅशेज उना --''कारभारी , ... आमेन समजाळी समजाळी थकी गऊत.. तो ऐकालेच तयार नही! त्याले सांग हो आमेन..पण गळी पाणी कवय पळी आऊ नांद लावस नुसता ! कारभारी ले बलाइ धाडूत भो म्हणत.. तुमेन सक्काय नी गाडी वर हातोडा ले निघी या! मुक्काम नी गाडी नही सापडाव तुमले आते! सक्काय मा बिन आंग तोंड धोवान निघी या... आठे व्यवस्था वही जाईन ! काय नी भो त्यानी पुरी आव सोडी दिनी.. त्याना हात पाय ढिल्ला पडाले लागी ग्यात! काहीतरी ईज्या -मंतर करा नी आमणी खेळमा पाणी पाळा ! तवय भाऊ हुसमयी ,नी आव लागी !"
कारभारी जगू भो ना म्यॅशेज वाचीसन चकरायी गयात ! तरी बी कारभारीनी आखो म्यॅशेज वाटलावा ---"दखा भो ,सांगानं आमनं काम शे ! बाकी कारभारीना दोस्तार इतला हलका नयी रावाव ! २१ तारीख लुगा थांबा ! पोयानी अमावस व्हयनी का बरसात जोरदार शे बरं ! अनेर पाइन ते शिरपूरफाटा -शिंदखेडाचौफुली आणि शहादा लुगा पाणीज पाणी राई !''
जगू भो म्हणे , ''भाऊ ले धीर नयी ! तुमी सक्काय मा निंघी या ! लागी ते धना भो नी टुरुंग गाळी वर निंघी या , पण या !"
कारभारी : '' हाथ पाय जर गयतं व्हतीन ते आखो हफ्ता भर कय काळ म्हणा , कॉमळीनं सूप दिज्यात भाऊ ले ! हाथ पाय ताठ चालतीन !''
जगू भो नी बी लग्गेज रिप्लाय दीना --''सूप ना ते भलताच आशिक से हो तो... काय सांगता येस आते तो विचार भी बदली टाकी... दखा मंग कालदिंन आयतवार भी से.. पाजाळी द्या त्याले सूप.. तुमनच ऐकस तो!''
कारभारी म्हणे --''अरे दोस्तार सरावण बाप्पा ले ते जाऊ द्या ! जोत लावणी पळी ! सरावन बाप्पा गया का बराब्बर जोत लागी !''
तथायीन शिरपूर वाला योगु भो नी बी म्याशेज दीना --''अस म्हणतस जायेल देव पोयाले येस भो म्हणून जास्त चिंता नको''
कारभारी म्हणे ,''१६ तारीख ले बरडना बाग जाणं शे , तवय नेम्मन समजाळी दिसूत !''
म्याशेज म्याशेज ना चक्कर मा सुरतवाला रवी शेठ ना फोन उना ! शेठ ले कारभारी नी कानगी करी ते शेठ म्हणे --'',''सरावन कीतला बाकी रायेल शे ते पूल वरतून दखी रायणा व्हतीन म्हणे !''
कारभारी म्हणे , ''सरावन बाप्पा काय पूल वरतून दिखी का ? आम्ले अशी वाटस कि जवलुगा जोरदार पाणी पळस नयी ने हाथोळाना नालामा उसुम दाटास नयी तवलुगा भाऊ काय पूल वरतून उतरावं नयी !''
रवी शेठ म्हणे , '' तशी काय वाटस नयी ! एखादा नी पूर येवाणी थाप दी टाकेल व्हयी त्यामा जुवान गर्दी व्हव्हाना पयले पूल वर जागा समायि लेणी व्हयी ! नयी ते मंग फाटा वर खोळगाव --हाथोळा नी कोणी फटफटी लागेल शे का ते दखस व्हयी ! कोणी फुकट किदरावाल नको जोयजे म्हनीसन !''
कारभारी म्हणे , '' अशी बी राऊ शकस ! तशा खोळगाव --हाथोळा वाला चतुर शेत !''
तितलामा दीपा भोना फोन उणा ---''कारभारी , यासनं टेन्सय नका ल्या ! या रस्तामा दा ठिकाणे फटफटी उभी करतस नी शेल्फया काळतस ! आणि मेर वर बठीसण हशी हशी गुल्फया खातस म्हणे ! एखाद टेम पूल वरतुन कथा दखतस व्हतीन ! पुरा फोटो राहता ते बरुबर समजतं ! ''
कारभारी म्हणे , ''व्हतं तेन बय ! अशी बी शे आखो !पण तशी रातं ते पुरा फोटो कसाल टाकतींन !''
दीपा भो म्हणे ,''लागी ते जितू ले इचारी ल्या !रायसिंग भो नी कळक सरावन पायाना आगाऊपणा ते करी टाका , पण आते काय रावात नयी म्हणे! म्हणीसण सोतानं सत दखी रायणात त्या ! अमावस नी कर लुगा माघायी रावास का नयी अशी ! ''
कारभारीनी डोकावर हाथ मारी लीना !
तेन बय ,लोके बी काय उपाद्या करतींन भो !
दखतस मंडई , सक्काय नी गाळी वर खोळगाव -हाथोळा शिवार ना दौरा मारणा पळी ! पण तरी बी कारभारी म्हणतस : '' का मंडई ,थोळा धीर धराल जोयजे का नयी ? का यास्नी गत ---- चांगलं से का आयी ? खोटं शे का ? खोटं वही ते परत !-----आपलाज कारभारी
(C ) लेखक : श्री जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे (वाठोडा)
शिरपूर , ता: शिरपूर जि :धुळे
No comments:
Post a Comment