Saturday 28 October 2017

"बिल्याक मनी आणि उबगेलवाडी"



भारत देशना अर्थमंत्री  जेटली साहेब नी भारत मा ''अँटी बिल्याक  मनी दिन'' देसमा मनाळाना आदेस काळा आणि देसमा लगेज भगत लोके थोबाळबुक नी व्हॅट्स अप वर घुमाल लागी गयात ! उबगेलवाडी बी चिंतामा पळी गयी ! आते सालभरमा खंडी भर दिन आपुन मनाळी रातस ! त्यामा आऊ दिन कशा मनाळाना आऊ इचार मा जगू भो , दीपा भो , पिरन भो , रायसिंग भो , धना भो  गुंगायी जायेल व्हतात ! ठिबक सुरतवाला रवी शेठ आणि परवीन शेठ बी चिंतामा पळेल व्हतात ! पयलेज जीएसटी ना पायरे उजी किदरी जायेल शेत बिचारा , आखो काय नवीन धुतरुंग शे त्यामा बिचारा नंदुरबार ले पिंटू दादांना गम काहीतरी तोडगा काडाना कुरता उनात ! पिंटू दादा म्हणे मी पेपर मा टाकाशिवाय दुसरं काहीज मदद करू शकत नाही ! आखिर ले सुरती मंडई उबगेलवाडीना गम आपली टूरुंग हेंडालत यी पळनी !

मंडई पिरनभो नी फिरंगी व्हटेल मा बठणात ! कारभारी बी उनात ! गप्पा सुरु व्हयन्यात ! कारभारी म्हणे ,''आज काय नवी ख़ुशी शे भो ! अख्खी मंडई यी पळनी ! ''
रवी शेठ नी आपला कुळापा सांगा ! जगू शेठ म्हणे , ''सरकार अँटी बिल्याक मनी डे'' साजरा करा अशी सांगी रायनं, त्यामा मंडई चिंतामा शे !''
कारभारी हसाल लागणात ! 
पिरन भो म्हणे , ''आमेन बठा चिंतामा शेत आणि तुमी खुशाल हशी रायणात !''
कारभारी म्हणे , ''त्यामा चिंता करानी काय गोट शे ? आपुन जशा बाकींना दिन मनाळतस तशा आऊ बी दिन मनाळी  लेवाना ! ''
धना भो म्हणे , ''कारभारी , दिन ते साजरा करणा शे पण कशा मनाळांना? आठे गंमत अटकेल शे ! त्यामा आमेन चिंता मा शेत ! आऊ गुंता कश्या सुटी !"
कारभारी , ''तुमी काय चिंता मा शेत आणि आऊ गुंता कश्या सुटी आयी आम्ले समजी  रायनं ! पण सवाल बिल्याक मनी ना शे ! आम्ले धव्या पैसा बी महिनां महिना दखाल भेटस नही , ज्या भेट्तस त्या उधाऱ्या चुकाडामा चालना जातस ! ते आमेन काय सांगसुत ?  आणि आऊ दिन कश्या मनाळाना या बारामा काही जी आर येईल शे का?"
रवी शेठ म्हणे ,'' कारभारी, अक्खी मार्केट मा तपास काळा तरी अजून कोणलेज  काही मालूमात नही शे !''
पिरन भो म्हणे , ''मी मना एक दोस्तले फोन वर इचार व्हतं , इन्कम टॅक्स अधिकारी शे तो ....त्याले बी अजून पत्ता नही शे ! '' 
पिरनभो ना मुकला दोस्त शेत पण मंडई ले पिरन भो नी कधीज कोणले  भेटाडेल नही शे त्यामा कोणलेज खरं वाटे नही !  
दीपा भो म्हणे , ''अँटी बिल्याक मणी दिन मनाळाना कुरता काय पैसा कोठे सापळी?"
रायसिंग भो म्हणे , ''आपुन पण जो खुरदा पळेल शे ना , त्यालेज कोयसा लायीसनी काया करी टाकाना आणि पिलोगराम मोळी लेवाना !" 
रायसिंग भो बोलताज जगू भो घाई  काय रावायनं नही ! जगू भो म्हणे , ''कोयसा लावाना म्हणजे काय पुंजा करणी शे का ? ओ बिचारा , अँटी म्हणजे इरोध करणा शे आपुन ले ! यांना पुळे काय पैसा वापराना नही,    कोणले काया पैसा वापरू देवाण नही, आणि जर वही सरकार जमा करी टाकाना  ! अशी करानं शे भो ! ''
रायसिंग भो , ''मंग आपुन ते काया पैसा वाला नही शेत ! आपुन काबर चिंता करानी?"
रवी शेठ , ''तरी बी अश्या दिन मनाळीसण काय काया पैसा धव्या वही जाई का ? "
धना भो म्हणे , ''बय आठे , भारी भारी साबू लायिसन बी लोके गोरा व्हतस नयित ते पैसा कश्या धव्या व्हतीन ?''
कारभारी म्हणे , '' याना पुळे तुमनी इस्टेट , वेव्हार कागदवर  दखाल जोयजे ! त्यामा आयी नाटक शे ! पण त्यांना तरास मध्यम माणूस ले वही ! ज्या अरबपती शेत त्या मज्यामा रातींनं ! कुळापा आपला शेत ! ''
परवीन शेठ म्हणे , '' माले अशी वाटे कि भो काया पैसा हर एक गाव मा  लोके गोया करतींनं तो आपुन कमिशन वर ली टाकाना आणि सरकारी बँक मा जयिसंनं भारी टाकाना! हजार ना मांगे शंभर बी सुटणात तरी कमाई वही जाई ! चार पाच करोडना मांगे पन्नास साठ लाख बी रायणात तरी कोणा बापना?''
''सरकारना !,'' कारभारी बोलनात!
परवीन शेठ डोकं खाजाल लागणात , ''आ कश्या काय हो ? ''
कारभारी म्हणे , ''सरकार तुमले इचारी, आयी रक्कम कथाईन जमाळी ? मंग काय सांगश्यात ? सुरत पाहीन ते दहिंदूला लुगा छापा पडतींनं !''
परवीन शेठ आइकिसन गुच्चूप बठणात !
पिरन भो म्हणे , ''आपली बठी कष्टानी परापेट शे त्यामा चिंता नको ! फक्त सरकार म्हणस त्यामा आऊ दिन कशा मनाळाना ती चिंता शे !''
जगू भो म्हणे :'' आमेन आत्तेज वल्ला-वल्ला शिशी टीव्ही कॅमेरांना बिजनेश मा ऊतरनुंत, धना  भो  नी आतेज ''धना म्याचिंग'' नं दुकान खोलेल शे , दीपा भो नी आणि जितू भो नी बी दिवायी ना मौकावर नव्वा जेशीबी लिनात ! रायसिंग भो बी काहीतरी नवा उद्योग खोलाना इचारमा शेत ! फकस्त कारभारी मोक्या शेत ! खडू-फळा-कॉम्पुटर -कागद- पेन आणि मायिक ! ईतला उद्योग ! मंग काया पैसा ते कोपान नही शे ! आयी उपादी शे ! ''
रायसिंग म्हणे, ''आपुन अशी करुत सरकार ले माहितीना अधिकार मा इच्छारूत, कि काया पैसाना इरोध मा काय कराल जोयजे ? काया पैसा धुंडान काम आम्ले द्या ! आमेन तो जोयतस ! आणि सरकार जमा करतस. फकस्त आम्ले त्यांना बदलामा काहीतरी कमिशन ठयराई द्या ! सरकारी अधिकारी आयी काम काय नेम्मनं करावत नहीत !"
रायसिंग भो बोलणा तवसुंग जोर जोर मा टाया पडण्यात ! बठी मंडई ले रायसिंग भो नी बात पती गयी ! आपला रायसिंग भो सुद्धा एखादा अर्थतज्ज्ञ ना माईक इचार करस या गोट नं कारभारी सकट मंडई ले कौतुक वाटणं ! पण जगू भो ले उजी अनबक लागी उठणं ! जगू भो ना गम दखत रायसिंग भो ले जोर सुटना---- ''हाथोळा वाला शेत आमेन ! आम्ले काय आशाज समजनात का ?''
त्यावर जगू भो म्हणे , ''हा मोठा वायायी ग्यात ! आते पुळे कशी करणं शे ते सांगा ! पावना पयी येईल शेत आपली गम ! "
जगू भो नी बात आइकिसन पिरन भो व्हटेल माना गिरायिक दखाल चालना गयात ! धना भो म्हणे   दुकान ना गम एक चक्कर मारीसन येस, रायसिंग भो म्हणे माले बी साळूना गम बलायेल शे ! जगू भो ले बी शिशी टीव्ही कॅमेरा ना कुरता कोणा तरी फोन उणा , भाऊ ह्यलो ह्यलो करत नबेदा व्हयी गयात !
बठा काना कान व्हयी गयात ! कारभारी म्हणे , ''चला रवी शेठ , आपुन जावुत जेवा बिवा ना पिलोग्राम कराले! 
कारभारी आणि रवी शेठ , परवीन शेठ एक व्हटेल वर बठणात ! जेवायी बिवायी गये नी मंग एकेक ना फोन येवाल लागणात ! कारभारी , कोठे शेत हो ? ???
कारभारी म्हणे , ''आम्ले काया पैसासनी खान सापळनी , आमेन आते तिबाक चालणूत !''
बठा एकज आवाज मा बोलनात ,''कोठे हो , आम्ले बी येऊ द्या ना ! ''
मंडई हॅलो हॅलो करी रायंती .....कारभारी आणि रवी शेठ अनरिचेबल व्हयी गयात ! मंडई ठायकी ''काया पैसा --धव्या पैसा'' ना गाना म्हणत बठी रायणती आणि रवी शेठ देऊरमा नी कारभारी आपली आपली घर उताणा पळेल व्हतात!  ----(c ) लेखक : श्री जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे , शिरपूर जि. धुळे [महाराष्ट्र]

Tuesday 17 October 2017

''सोपाऱ्या--फोड कट्टा ''


कारभारी आणि तुंबालाल अप्पा आज एकजोगे बशेल व्हतात.
अप्पा म्हणे , "कारभारी , आते वल्ला वल्ला गुजरात तुन उनात नि आखो काल्दीनं कथा गयथात ?"
कारभारी म्हणे , "नंदरबार ना गम जायेल व्हतूत. हातोडा वाला रायसिंग भो , खोडगाव ना दीपा भो बी संगे व्हतात. धना भो आमना कानमा दिसन सुरत ना गम नयकी जायेल व्हतात , नि जगू भो नि एन टेम ले उच्चे बगले करी दिनात, नही ते या बठासले एक संगे लयी जावाना पिल्यानं व्हता कारभारीना !पण सकसेश नही व्हयना आमना पिल्यानं !!" 
तुंबालाल अप्पा म्हणे ,"आम्ले बी कदी मदी लयी जात जावा ! दखा कारभारी ,आऊ धना भो मोठा बेरकी शे, हम्मेस त्यानं त्यांनी फिराक मा रास ! आणि जगू भो न बी काय खरं नही ! खटा अप्पाबी हम्मेस बांड्या राग ली धरस!"
कारभारी म्हणे ," खरं शे तुमनं म्हणनं! सानू मास्तर बी दूर व्हयेल ना गत रास ! गुरु चेला नी अशी जोळी जमेल शे ते आपला काय याद यी! ऐकू अण्णा बी ध्यान देत नही. लोके ज्यानं त्यानं दुनिया मा मगम शेतस, रस्तावर भेटणात ते कोल्ला राम राम ठोकतस. काय खरं नही शे दुनियांनं !"
कारभारी आणि तुंबालाल अप्पा चावयी रायणतात तवसुंग जादू न्हानजी बी यि पडणात! राम राम शाम शाम व्हयनं तितलामा खयाना गमतुन जोरमा आवाज उणा ! इस्कुन्डा--फारदा--नारदा --पिलारदा --डू!
कारभारी म्हणे , ''आवण उजी डुकरे माती जायेल शेतस नहीत?"
जादू न्हानजी घाई काय रावायनं नही , "आयायायाया, म्हणे राजा ले दिवायी जशी माहीत नही ! कारभारी तुमे गावना गम फेरी टाकतस नहीत त्यामा तुमले कशी काय मालुंग पळी! डुकरे नही मातनात , ते त्या गताळीसले खावाळी--पेवाळी--न्हावाळी--- माताळी रायणात !आपला दानु शेठ नि डुक्रेस्ना फारम टाका ,आयी माहित नही तुमले?" 
कारभारी जोरमा हसनात ! कारभारी म्हणे , ''आम्ले माहिती नही ! बरं व्हयी गे , मांगला हफ्ता मा नानू भो पार्टीले बलाई रायणतात , पण आमेन सांग कि आमनं बंद शे ! बरं व्हयनं भोस्वन, आमेन गवुत नहीत. या चालू दानु शेठनं काही सांगता येत नही ! दानु शेठ भी उद्योगी शेतस ! कवय कुट्टी ना कट्टा , कवय इट ना भट्टा नी आते खुशाल डुक्रेस्ना वट्टा ! या काय काय कुट्टा करतीन नी या काय काय सट्टा लावतीन यांना नेम नही !" तुंबालाल अप्पानी पेपर मा कायतरी वाचं!
,'' कारभारी, आऊ पेपर दखा ! काय लिखेल शे ! कोणती तरी पार्टी वाला त्यास्ना जिल्हाना अध्यक्षसले कारपियो गाळी दि रायणात म्हणे !खरं शे का आयी ?"
कारभारी म्हणे , ''पेपर मा जर येयेल शे ते खरं व्हयी ! भागबली शेतस बिचारा ! त्यास्नी बी येवस्था लावणी पळी ना पार्टीले  ,आमेन आऊ इशय वर काय बोलतस नहीत. काय शे लोकेस्ले कारभारीना बोलेलना उजी चरका लागी उठस!!'' 
तुंबालाल अप्पा म्हणे , ''बय, आपुन काय पाप करेल शे कि आपुन जठे शेतस तठेच शेतस , उलटा हेटे चालणूत ! आपल्या वावण्या झिंजायी चालण्यात , पण आपली काय कोठे लाटरी लागत नही"
''आखो झेंडा धरा! झेंडा धरणारा ठायका रातीनं! गाड्या उडावणारा गाड्या उडावंतीन! आपुन आठेच सुतार ना मेट वर बिड्या फुकत बसा नही ते वाकळी चोया, तुमन्या कपाश्यासले भाव नही भेटावं , तुमना रस्तास्ना खड्डा नही बुजावात ," जादू न्हानजी बोलनात!
तुंबालाल अप्पा म्हणे, ''कारभारी ,आपुन बी आपली पार्टी काळूत !! ''
कारभारी जोर जोर मा हसनात. कारभारी म्हणे , ''अप्पा , आपुन पार्टी काळी , आपुनज आपला पैसावर आपली जाहिरात करानी म्हणजे आप्लाज पॆसास्नी गुलाल लिसन आपलाज आंगवर टाकाणी ! वाजा बी आपुन वाजाना नि नाचानं बी आपुन ! अशा खे व्हयी जाई ! चांगला चांगला असामीसन्या पार्ट्या टिकण्यात नहीत तवय आपला कथा टाया शे ? बाकिन्या डझनभर छटाक छुटाक पार्ट्यासनी मान्यता काळी टाकेल शे निवळनुक आयोग नि ! आऊ काय सादा खे नही शे भो ! आऊ येळा व्हवांना खे शे ! आपुनले काय परवडावं नही ! आपुन खुशाल आठेज मारतीना पार वर बसानं आणि खुशाल सोपाऱ्या फ़ोडान्या ! 
काय मंडई , खोटं शे का? खोटं व्हयी ते परत !"
लेखक @ आपलाच दोस्तार : जयपाल सर , शिरपूर

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...