आज मंडई उबगेलवाडी मा जमेल व्हती ! इबाक -तिबाक बट्ठठी खेड मा आऊ फ़ोटोक माना ''सांडू'' भो नी गोट लामेल व्हती !कारभारी म्हणे ,''आऊ सांडू भो वर काय बनी उणं जो खुशाल पाणी नी टाकी वर चळी गया भो ?"
जादू न्हाणजी म्हणे --,''आरं त्यांनी याना बाटोड मारू यानी बाटोड नी ! न्हाणा वढाय शे का आऊ सांडू ? कीतला वरे जाई भिडणा ?''
सुखराम दाजी म्हणे --''आं अं हा हा सालं आई ते सोले म्हाना धर्मेंदर नी गत व्हयी गे ! आपुन म्हणो मुक्क जनावर शे ,पण न्हाणं बाकं शे का ?"
तुंबालाल अप्पा म्हणे , ''त्यांना बी जीव कथा गुंतेल व्हयी , काही उधारी अटकेल व्हयी नही ते कोणी कळक करी दीना वही ! सध्या लग्नेससनी धूम शे म्हणे !"
गुल्या भो म्हणे , ''खोडगाव वाला जगू भो आणि धना भो नव्व्या टूरुंगा लयनात नी त्यास्नी सांडू भो ले काय निय्या चारा दिना नही व्हनार त्यामा सांडू भो रागे भरणा व्हयी !"
बठी मंडई हसाल लागणी !
कारभारी म्हणे ---''माले काय तशी वाटस नही ! एक जण फेसबुक ना वावरे समायस नी दुसरा जुवान व्हाट्स अप न्या मया पिकाडस.....त्यास्ना आणि गाळा -बैलेसना संबंध नही ! आऊ हायबीरिड ना जमाना शे , मानशे चगी चालनात -आयी ते मुक्क जीव शे ! त्याना काय दोस ? आम्ले ते दानू शेठ वर शेंखा शे ! त्यास्ना फारम ना वास ले किदरीसण गळी वरे जाई भिडेल वही !''
दाजी म्हणे --''हाआआ --आयी गोट बी नमुदबन शे बरं ! पण आऊ सांडू काय आपली खेड माना दिखत नही ! बरड माना वही ! तिबाक चारा-पाणिन्या बिफ्ता शेतीस म्हणे ! ''
दीपाभो ले पिपरी वालास्नी शेणखा व्हती ! पण कारभारी म्हणे सध्या मनोज भो 'मन्या भाई' बनानी पिर्याकटिस करी रायणात नी बंटा भो नाशिक मा शेत ,त्यामा त्यास्ना काय दोस नही व्हनार !
नांथे वाला रवी बन्ना म्हणे , ''कारभारी , आऊ सांडू भो पुत्तर परदेस वाला मुलायम तात्यांना ते नही ?" कारभारी म्हणे , ''तात्याना राहता ते त्याले इबाक येवाणी जरुरत नही व्हती ! तात्या नही चारा देता ते गोरखपूर चालना जाता ! आणि धयडा व्हस तव सुखना खाता -पेता ! तठे ते काय वांदाज नही व्हता ! नही तिनी अख्खी लेस बाबू खुशाल आजमगड ना खोदरास्मा चाराल लयी जाता !" रवी बन्ना म्हणे ,''त्यामा इबाक पयी -बीई येईल वही तो भिडू !" भरत बापू म्हणे ,''त्यास्ना तपास काळा बिगर कस काय चाली ? आमना वराडकर पुरा पाठा तपास काळतस.....गोटू भो ते माहित शे ना ! या नांथे वालास्ले उडणंत्या खबरी पसाराणी सवय शे !"
तुंबालाल अप्पा म्हणे --''आम्ले ते तो लामकानीवालासना दखास ! दुशेर ना पुळे दांडी बांधीसन निय्या चाराना पुय्या बांधी देतस--नागर वळी लेतस नी काम व्हयनं का खुशाल कुटार मा सोळी देतस म्हणे !त्यामा रागे-बिगे भरणा व्हयी ! नंदुरबार वाला ग्यानबा चावी रायणता अशी काल्दीनं ''
तुंबालाल अप्पानं आयकीसण कारभारी ले उजी जोर मा हसू ऊनं !
जादू न्हानजी म्हणे , ''आपले ते चावयनं सूची रायनं ! पण आऊ सांडू भो कशा उतरणा वही ? नही ते कोणता ग्यान्या जोश्या नी त्याले उतारा वही ? कशा उतारा वही त्याना तपास करणा पळी !"
कारभारी म्हणे ,''जर तो उतरी पळता नही ते कोण उतारता ते आवसुंग फेसबुक नही ते व्हाटस अप वर फ़ोटोक चमकाल लागी जाता ! अजून ते तशी काय खबर बात पसरेल नही !"
गुल्या म्हणे ,''बराब्बर शे कारभारी ! सांडू भो उतरताज काही हुसन्या पावशेर शेल्फी काळाल चालना जातात ! चला आपुन दखी येउत ! आपला शिवाय व्हवाव नही काही नेम्मन ! ''
चला मंग मंडई , आमेन जाई येतस तवलुगा तुमे करा आराम खुशाल ! मुक्क जनावर शे ! त्यांना बी काय ताड -तपास कराल जोयजे का नको ? खोटं शे का ,मंडई ? खोटं वही ते परत !
आप्लाज दोस्तार : जयपाल सर ,शिरपूर jaypalg@gmail.com [Copyright is reserved for Karbhari only]

No comments:
Post a Comment