Sunday, 14 July 2019

॥ किरकिर किरकेट॥

॥ किरकिर किरकेट ॥
"हौशा-नवशा-गवशा बी ,
काळतीन त्यासनी  मयमय !
बॅटना एवळं ज्यासनं वजन,
त्या बी करतीन वयवय !"

जड़ेजा नी कोशिश करी,
बॅट चलायी सयसय !
बाकी ते पटापट पटकी ग्यात,
कितला करश्यात येळाचय !

आऊ खेता-तो जाता  ,
उजी बाटोळस्ले कयकय !
धोनीना नावतून बोटे मोळी,
खप्पाकुल्ल्या करतीन जयफय !

अरे ,आऊ खे शे रे भीळूस्वन ,
तठलूगा भीळनूत-आउज शे विजय !
कसाले बोटे मोळतं बीगरकाम ?
कसाल उगायतस खय?

--(C) -----कवी ---कारभारी
Http://ubgelvadi.blogspot.com/

Tuesday, 27 November 2018

काय ती मज्या ! काय ते धाकलपण !

"आपला बी एक जमाना व्हता भिळू ,
उजी अदभूत व्हती कारागिरी !
आज ना खेणास्मा ती मज्या न्ई ,
याद हम्मेस करस कारभारी ! "

तोटाना गाळा-बैले ,माटळाना टयाँक्टरे,
मज्या ये-ये मुकती भारी !
काटा घाली उचकेत आगपेटयास्ना डंपर,
त्या धाकलपण नी मज्याज न्यारी !

काठीना घोळा -बाहुल्यास्ना बायतोळा,
भातकुलनी ती मज्याज गई सरी !
हँग-हँग करत गाळी हेंडालूत ,
वलांडूत जवय गढेर नी चारी !

फुटाणा-वटाणा नी शेंगदाणा ,
कदय बिस्कुट-कदय खारी !
आजना म्हागा नास्तानं भूषाण नई ,
याद हम्मेस करस कारभारी !

आपला दोस्तार-जयपाल सर ,वाठोडा,शिरपूर

(कारभारी शिवाय कोण लिखाव शे !)

Wednesday, 28 February 2018

"व्हयी नी धुई -----मीठ लायीसन खावा गुई !"


व्हई ना मौका दखिसन  उबगेलवाडी ना बठा धल्ला पारवर जमनात . सुरतवाला रवी शेठ ना कारभारिले फोन उणा ! 
शेठ म्हणे आवण नि व्हयीना काय पिलोगराम शे म्हणे ? 
कारभारी म्हणे अजून ते मंडई जमा रायणी बारे ! दखूत काय सजस ते  ! 
टिव्ह्यावाला रात दिन शिरी देवी शिरी देवी दाखाडी रायणात त्यामा आख्खी उबगेलवाडी उबगी जायेल व्हती !पिपरीवाला बी पिप्री लाईव्ह मा र्मी जायेल व्हतात ! मन्या भाईंनी बी लगीन व्हव्हापायिंन फेसबुक वरणी हवा फिकी पडी जायेल शे आणि बंटी भो बी रोजना जोजार मा ठकी जायेल शेत !
  देसना कुरता शहीद व्हयेल सैनिक पेक्षा फिल्लम वालासले एडीढायना लोके बिगरकाम डोकंसासवर मिरायी रायणात यांना पिरन भो , दीपा तात्या आणि रायसिंग भो ले उजी गुस्सा व्हता !   जगू भो व्हाट्स अप वर तीचिक करी रायणता तितलामा   तथायीन खटा अप्पा , परवीन शेठ पोटझोड्या ठोकत उनात ! 
दानू शेठ ना आंग मा व्हयी नी जोत लागी जायेल व्हती ! 
ढोलगासना नांद मा दानू शेठ बी बोली रायणतात ! ''नंकि--नंकि --नंकि --ढन ---ढढ नंक !" 
तवसुंग फारमवरणा पिल्लासनी याद उणी नी दानू शेठ नबेदा व्हयी ग्यात!  
  त्यास्ले दखिसन गुल्या भो कोकलना , ''आवन नि व्हयी उच्ची , +++++'' . तो पुढे काय बोली तितलामा कारभारीनी  डोया वटारात . गुल्या भो मुंग गीसन ठायका बठना . जादू न्हांजी घायी काय रावायान्न नही ,
''आऊ , खवळी ढोसली उना व्हयी त्यामा उजी वच -वचं करी रायना !"
''आरे आते कुच्ची कोनले ठोकानी ?? व्हयी नि मज्या रायनी कोठे ? याले बोलना ते त्याले राग, नि व्हयी सोडीसन दसराले मांगा फाग ! अशी गम्मेत शे ! काय करशात ?", कारभारी नि बागीजकनी   गुगली टाकी . 
"कुच्ची ठोकानी व्हयी ते त्या बाट्टोडस्ले ठोकाले जोएजे ज्या औ देस मजार धुमाडा मचाडी रायनात ! दुस्काय पडेल शे , पेवाले पाणी नही भेटी रायन , शेतकरीना माल ले भाव नयी ! या हुल्ला -फुक्या सोंगे खुशाल ---भारत माता कि जय नई बोलाव ; काश्मीर मोक्ये करी देवाले जोय्जे ;आम्ले पटी ते बोलसुत --आम्ले पटी ते खासुत ---आम्ले पटी तशा रहासुत ---आमक्या जिंदाबाद ---तमक्या मुर्दाबाद ! त्यान बंय या लोकेसले काय कामे बिमे शेतस का नहीत ?? त्या टी वी वरना गुलफुक्या टीटोय़ा बी दिन रात डोकं खातस ! शिकन सोडीसन पुढारपण करी रायनात ! " --आमना जादू न्हांजी ना जीव खव्वी ग्या . 
जादू न्हांजी ले थंडा करत पुंडा तात्या बोलनात ,''बाकी ना म्हणे आमेन अशाच करसुत ; दुसरा म्हणे तुमले दखी लीसुत ! काय दांगडो माताडेल शे भो यास्नी ! आमेन बी राजकारण करेल व्हत ! पण आम्नी व्हखय ले अशी नही व्हत ! भारत माता वर बी राजकारण ?? आते हद व्हयी गयी बर ! लोके बठा तमासा दखी रायनात ! तुमन राजकारण चुला मा घाला रे , देश नि सैनिक लोकेस्नी बदनामी काबर करी राय्नात ! नेम्मन रावा म्हणा ! 
"आठे लोकेसले खावलानी पडेल शे ---त्या अगला बापस्ना देणा -लेना फिटेल नयीत ! मोठ्ला लोकेस्ना कर्जा बुळायी देस सोळी पयी रायणात ! आपले काय खडकू हानी फेकावूत नैत ! तो किंगफिशर  दारूवाला जुवान आणि तो निरव मोदी खुट्टा दायीसन भिन्नाट देस बायेर नयकी गयात  ! त्यास्ना धपाडा धसाडले जोयजे , ते सोडीसन या बिच्चारा खुशाल हवामा दगडे मारी रायनात . काय मंडई खोट शे का ? खोट व्हयी ते परत !" , तुम्बालाल अप्पा आपली ढेरी वर हाथ फिरावत बोलना . अप्पांना इचार जगू भो ले पटी गयात ! धना भो म्हणे , ''एकदम बराबर कारभारी, तुंबालाल अप्पानी गोट मा बात शे  ! '' पिरन भो ले बी इचार मा दम वाटणा !
गोटन जीभो म्हणे यासले उंडायामा वावरे नागराले वाट लावाले जोय्जे ,तवय नेम्मन रहातीन ! कारभारी म्हणे --''यासले बोंब पाडनी व्हई ते रस्तावर गया खल्लान सोडीसन गावमाना बल्ला-खल्ला देखा , तठे झाडे लावा , पाणी ना कुर्ता काय तरी करा , गोर गरीब ना कुर्ता दोन टाईम खावानी सोय व्हई अशी काय तरी काम करा !"
शेरी म्हाणा सोट्या तथायीन कोकलना ---"आवन नि व्हयी उच्ची ……। आते लोके काय बोल्नात ते माले नका इचारा बर गड्यासव्हन ! इचारामा मज्या नही ! ---आपला दोस्तार : जयपाल सर ,वाठोडा (शिरपूर )

Thursday, 28 December 2017

'' टांगा पलटी --घोडा फरार ! उबगेलवाडीना नव्वा करार !!'' ''


उबगेलवाडी ना पारवर कारभारी बठेल व्हता ! सध्या थंडी उजी कुमचाळी रायनी त्यामा कारभारी काय जास्ती बाहेर पळतस नहीत. दिनभर कामेसना जोजार बी वाळी जायेल शे त्यामा फ़ूरसूत भेटस नही ! 
फारम ना पसारा आवरिसन ''दानू शेठ'' उनात , त्यासना मांगे मांगे तुंबालाल अप्पा नी जादू न्हानजी  बी उनात !
दानू शेठ म्हणे ,''काय कारभारी , सध्या टीम काय आदयस नही ?" 
तुंबालाल अप्पा म्हणे , ''हा ना हो , सध्या मंडई काय चमकत नही ! नहीं ते सयसांजे रोज बैठक राहे ! ''
कारभारी म्हणे , ''आपला याद पळी गया व्हयी भो !''
 जादू न्हानजी म्हणे ,'' आयायांया ;अशी कशी व्हयी ? ज्यास्ले कारभारीना  याद पळणा; त्यास्ले कारभारी  कायमना भुली जास, आयी त्यास्ले माहीत नही व्हनार ! जागतिजोत शे आयी गोट  !''
दानू शेठ , ''जाऊ द्या कारभारी ! त्या नहित ते दुसरा पचास उभा करी टाकसूत आपुन ! तुमी ईतला जीव लावा पण लोके शेवट त्यास्ना त्यास्ना गाव-आखरे जायी पळनात ! तुमले सांगूत आमेन आपला गावगाडाना लोकेस्ले बी जीव लावत जावा अशी ! शेवट आपली खेळ मानाज लोके काम पळतस अशी !" 
कारभारी म्हणे , ''खरं शे तुमनं ! पण कारभारीले कोण संगे रायनं काय नी कारभारीपाईन दूर गे काय ! फरक पळत नही ! आयी दुनिया म्हणजे एक मोहमाया शे ! संगे कोण येवावं शे? काय कोणी कायम साथ देवाव नही ! दुनिया आयी मतलब नी येळी शे भोस्वन ! आमेन दखी रायणुत ! कोण कीतला का उड्या मारेना ! कीतला दिन उड्या मारतीन ? बराबर एकदिन ठायका बठतीन ! आपुन नुसती गम्मत दखानी !"
तुंबलाल अप्पा :- ''२४ कॅरेट खरी गोट शे ,कारभारी ! पण कारभारी या लोकेस्ले तुमेन कीतला बी जीव लावा तरी यासले तुमणी कीव येवावं नही ! या टांगा पलटी व्हताज ;घोळाणा मायक फरार व्हयी जातस !" 
तुंबालाल अप्पांना बोलावर कारभारी सम्मेत दानू शेठ बी जोर-जोरमा हसनात !

दानू शेठ म्हणे ,''एकदम भारी बोलनात अप्पा ! लोके नुसता हाडके देतस ! पश्चिम पट्टावाला त्यामा आखो जास्ती पटाईत शेत !''
गप्पा सुरु व्हत्यात तितलामा सुरतवाला रवी शेठ ना फोन उना ! 
रवी शेठ म्हणे ,''राम राम कारभारी ! काय चालू शे ? काय म्हणस मंडई ?"
कारभारी म्हणे , ''राम  राम शेठ , काय नही ! मंडई सध्या आम्ले इसरी गयी ! हाडके दी--दी थकी  गयी ! पंधरा दिन झायेस्न कोनज दरसन नही ! लोके एखल्ला जत्रा दखी उनात ! कारभारी यास्ना कुरता गया नही ! मुन्ना दादाना आम्ले खास निरोप व्हता ! आमेन एखल्ला जातुत  ते या लोकेस्ले उजी जबून लागतं ! जाऊ द्या ! त्यास्नी ख़ुशी !''
शेठ म्हणे , ''या ते सावलीना मायक तुमना संगे रायेत , आणि आते कथा फरार शेत ?"
कारभारी म्हणे , ''टांगा पलटी --घोळा फरार'' अशी गम्मत शे रवी शेठ !''
टांगा पलटी --घोळा फरार आइकिसन रवी शेठ बी पोटझोड्याना मायक हसनात ! 
रवी शेठना संग गप्पा चालू व्हत्यात तवसुंग फोननी ब्याट्रीक मलाई गयी !
दानू शेठ म्हणे , ''रवी शेठ मस्त असामी शे ! कारभारी , तुमनावर मनपाईन पिरिम करतंस शेठ ! बाकी लोके तुमना नुसता काम पुरता वापर करतस , पण रवी शेठ उजी जानी दोस्तार !''
कारभारी म्हणे , ''रवी शेठना मायक दोस्तीज नही ! म्हनीसन रवी शेठ ले आमना दिलमा जागा शे !''
तुंबालाल अप्प्पा म्हणे , ''अजून बाकी कारभारी ? ३१ ना दिन काय पिलोग्राम शे?"
कारभारी म्हणे , ''दमन जावाना इचार शे ! रवी शेठ बलाई रायणात !''
दानू शेठ म्हणे ,''कारभारी,  आम्ले बी लयी चला तुमना संगे ! बठी दुनिया तुमना संगे फिरी येस नी तुमना याद पाळी टाकस ! आणि तुमी आम्ले कोठेज नही लयी ग्यात ,तरी आम्ले तुमना कदी बी याद नही पळणा !''
कारभारी म्हणे , ''बिलकूर ! तुमले सोळीसण कारभारी बी कथा जावा नही , फकस्त तुमी हम्मेस साथ द्या कारभारी ले , कारभारी तुमले जरूर मोठा करी !''
दानू शेठ म्हणे ,''संगे कोण कोण ले लिश्यात ? "
कारभारी म्हणे , ''दखुत ! तुमि ते शेत !आपले नव्वा सालमा राजस्थान ले एक लगीन ले बी जाणं शे ! तवय बी लयी जासुत !''
आणि आत्ते आपला -आपला ज्या ज्या जुना भिळूस्ले आपली आस लागेल शे त्यासना बी इचार करसुत ! आऊ आत्ते नव्वा करार राही ! 
कारभारी ना सांगावर दानू शेठ खुस व्हयी ग्यात  ! त्या खुशिमा ''टांगा पलटी --घोळा फरार ! उबगेलवाडीना नव्वा करार !'' गाणं म्हणत फारमना गम निंगणात तशा कारभारी बी घरना गम नयकनात !    लेखक : जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे ,शिरपूर ९४२२७८८७४०



















 

Saturday, 28 October 2017

"बिल्याक मनी आणि उबगेलवाडी"



भारत देशना अर्थमंत्री  जेटली साहेब नी भारत मा ''अँटी बिल्याक  मनी दिन'' देसमा मनाळाना आदेस काळा आणि देसमा लगेज भगत लोके थोबाळबुक नी व्हॅट्स अप वर घुमाल लागी गयात ! उबगेलवाडी बी चिंतामा पळी गयी ! आते सालभरमा खंडी भर दिन आपुन मनाळी रातस ! त्यामा आऊ दिन कशा मनाळाना आऊ इचार मा जगू भो , दीपा भो , पिरन भो , रायसिंग भो , धना भो  गुंगायी जायेल व्हतात ! ठिबक सुरतवाला रवी शेठ आणि परवीन शेठ बी चिंतामा पळेल व्हतात ! पयलेज जीएसटी ना पायरे उजी किदरी जायेल शेत बिचारा , आखो काय नवीन धुतरुंग शे त्यामा बिचारा नंदुरबार ले पिंटू दादांना गम काहीतरी तोडगा काडाना कुरता उनात ! पिंटू दादा म्हणे मी पेपर मा टाकाशिवाय दुसरं काहीज मदद करू शकत नाही ! आखिर ले सुरती मंडई उबगेलवाडीना गम आपली टूरुंग हेंडालत यी पळनी !

मंडई पिरनभो नी फिरंगी व्हटेल मा बठणात ! कारभारी बी उनात ! गप्पा सुरु व्हयन्यात ! कारभारी म्हणे ,''आज काय नवी ख़ुशी शे भो ! अख्खी मंडई यी पळनी ! ''
रवी शेठ नी आपला कुळापा सांगा ! जगू शेठ म्हणे , ''सरकार अँटी बिल्याक मनी डे'' साजरा करा अशी सांगी रायनं, त्यामा मंडई चिंतामा शे !''
कारभारी हसाल लागणात ! 
पिरन भो म्हणे , ''आमेन बठा चिंतामा शेत आणि तुमी खुशाल हशी रायणात !''
कारभारी म्हणे , ''त्यामा चिंता करानी काय गोट शे ? आपुन जशा बाकींना दिन मनाळतस तशा आऊ बी दिन मनाळी  लेवाना ! ''
धना भो म्हणे , ''कारभारी , दिन ते साजरा करणा शे पण कशा मनाळांना? आठे गंमत अटकेल शे ! त्यामा आमेन चिंता मा शेत ! आऊ गुंता कश्या सुटी !"
कारभारी , ''तुमी काय चिंता मा शेत आणि आऊ गुंता कश्या सुटी आयी आम्ले समजी  रायनं ! पण सवाल बिल्याक मनी ना शे ! आम्ले धव्या पैसा बी महिनां महिना दखाल भेटस नही , ज्या भेट्तस त्या उधाऱ्या चुकाडामा चालना जातस ! ते आमेन काय सांगसुत ?  आणि आऊ दिन कश्या मनाळाना या बारामा काही जी आर येईल शे का?"
रवी शेठ म्हणे ,'' कारभारी, अक्खी मार्केट मा तपास काळा तरी अजून कोणलेज  काही मालूमात नही शे !''
पिरन भो म्हणे , ''मी मना एक दोस्तले फोन वर इचार व्हतं , इन्कम टॅक्स अधिकारी शे तो ....त्याले बी अजून पत्ता नही शे ! '' 
पिरनभो ना मुकला दोस्त शेत पण मंडई ले पिरन भो नी कधीज कोणले  भेटाडेल नही शे त्यामा कोणलेज खरं वाटे नही !  
दीपा भो म्हणे , ''अँटी बिल्याक मणी दिन मनाळाना कुरता काय पैसा कोठे सापळी?"
रायसिंग भो म्हणे , ''आपुन पण जो खुरदा पळेल शे ना , त्यालेज कोयसा लायीसनी काया करी टाकाना आणि पिलोगराम मोळी लेवाना !" 
रायसिंग भो बोलताज जगू भो घाई  काय रावायनं नही ! जगू भो म्हणे , ''कोयसा लावाना म्हणजे काय पुंजा करणी शे का ? ओ बिचारा , अँटी म्हणजे इरोध करणा शे आपुन ले ! यांना पुळे काय पैसा वापराना नही,    कोणले काया पैसा वापरू देवाण नही, आणि जर वही सरकार जमा करी टाकाना  ! अशी करानं शे भो ! ''
रायसिंग भो , ''मंग आपुन ते काया पैसा वाला नही शेत ! आपुन काबर चिंता करानी?"
रवी शेठ , ''तरी बी अश्या दिन मनाळीसण काय काया पैसा धव्या वही जाई का ? "
धना भो म्हणे , ''बय आठे , भारी भारी साबू लायिसन बी लोके गोरा व्हतस नयित ते पैसा कश्या धव्या व्हतीन ?''
कारभारी म्हणे , '' याना पुळे तुमनी इस्टेट , वेव्हार कागदवर  दखाल जोयजे ! त्यामा आयी नाटक शे ! पण त्यांना तरास मध्यम माणूस ले वही ! ज्या अरबपती शेत त्या मज्यामा रातींनं ! कुळापा आपला शेत ! ''
परवीन शेठ म्हणे , '' माले अशी वाटे कि भो काया पैसा हर एक गाव मा  लोके गोया करतींनं तो आपुन कमिशन वर ली टाकाना आणि सरकारी बँक मा जयिसंनं भारी टाकाना! हजार ना मांगे शंभर बी सुटणात तरी कमाई वही जाई ! चार पाच करोडना मांगे पन्नास साठ लाख बी रायणात तरी कोणा बापना?''
''सरकारना !,'' कारभारी बोलनात!
परवीन शेठ डोकं खाजाल लागणात , ''आ कश्या काय हो ? ''
कारभारी म्हणे , ''सरकार तुमले इचारी, आयी रक्कम कथाईन जमाळी ? मंग काय सांगश्यात ? सुरत पाहीन ते दहिंदूला लुगा छापा पडतींनं !''
परवीन शेठ आइकिसन गुच्चूप बठणात !
पिरन भो म्हणे , ''आपली बठी कष्टानी परापेट शे त्यामा चिंता नको ! फक्त सरकार म्हणस त्यामा आऊ दिन कशा मनाळाना ती चिंता शे !''
जगू भो म्हणे :'' आमेन आत्तेज वल्ला-वल्ला शिशी टीव्ही कॅमेरांना बिजनेश मा ऊतरनुंत, धना  भो  नी आतेज ''धना म्याचिंग'' नं दुकान खोलेल शे , दीपा भो नी आणि जितू भो नी बी दिवायी ना मौकावर नव्वा जेशीबी लिनात ! रायसिंग भो बी काहीतरी नवा उद्योग खोलाना इचारमा शेत ! फकस्त कारभारी मोक्या शेत ! खडू-फळा-कॉम्पुटर -कागद- पेन आणि मायिक ! ईतला उद्योग ! मंग काया पैसा ते कोपान नही शे ! आयी उपादी शे ! ''
रायसिंग म्हणे, ''आपुन अशी करुत सरकार ले माहितीना अधिकार मा इच्छारूत, कि काया पैसाना इरोध मा काय कराल जोयजे ? काया पैसा धुंडान काम आम्ले द्या ! आमेन तो जोयतस ! आणि सरकार जमा करतस. फकस्त आम्ले त्यांना बदलामा काहीतरी कमिशन ठयराई द्या ! सरकारी अधिकारी आयी काम काय नेम्मनं करावत नहीत !"
रायसिंग भो बोलणा तवसुंग जोर जोर मा टाया पडण्यात ! बठी मंडई ले रायसिंग भो नी बात पती गयी ! आपला रायसिंग भो सुद्धा एखादा अर्थतज्ज्ञ ना माईक इचार करस या गोट नं कारभारी सकट मंडई ले कौतुक वाटणं ! पण जगू भो ले उजी अनबक लागी उठणं ! जगू भो ना गम दखत रायसिंग भो ले जोर सुटना---- ''हाथोळा वाला शेत आमेन ! आम्ले काय आशाज समजनात का ?''
त्यावर जगू भो म्हणे , ''हा मोठा वायायी ग्यात ! आते पुळे कशी करणं शे ते सांगा ! पावना पयी येईल शेत आपली गम ! "
जगू भो नी बात आइकिसन पिरन भो व्हटेल माना गिरायिक दखाल चालना गयात ! धना भो म्हणे   दुकान ना गम एक चक्कर मारीसन येस, रायसिंग भो म्हणे माले बी साळूना गम बलायेल शे ! जगू भो ले बी शिशी टीव्ही कॅमेरा ना कुरता कोणा तरी फोन उणा , भाऊ ह्यलो ह्यलो करत नबेदा व्हयी गयात !
बठा काना कान व्हयी गयात ! कारभारी म्हणे , ''चला रवी शेठ , आपुन जावुत जेवा बिवा ना पिलोग्राम कराले! 
कारभारी आणि रवी शेठ , परवीन शेठ एक व्हटेल वर बठणात ! जेवायी बिवायी गये नी मंग एकेक ना फोन येवाल लागणात ! कारभारी , कोठे शेत हो ? ???
कारभारी म्हणे , ''आम्ले काया पैसासनी खान सापळनी , आमेन आते तिबाक चालणूत !''
बठा एकज आवाज मा बोलनात ,''कोठे हो , आम्ले बी येऊ द्या ना ! ''
मंडई हॅलो हॅलो करी रायंती .....कारभारी आणि रवी शेठ अनरिचेबल व्हयी गयात ! मंडई ठायकी ''काया पैसा --धव्या पैसा'' ना गाना म्हणत बठी रायणती आणि रवी शेठ देऊरमा नी कारभारी आपली आपली घर उताणा पळेल व्हतात!  ----(c ) लेखक : श्री जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे , शिरपूर जि. धुळे [महाराष्ट्र]

Tuesday, 17 October 2017

''सोपाऱ्या--फोड कट्टा ''


कारभारी आणि तुंबालाल अप्पा आज एकजोगे बशेल व्हतात.
अप्पा म्हणे , "कारभारी , आते वल्ला वल्ला गुजरात तुन उनात नि आखो काल्दीनं कथा गयथात ?"
कारभारी म्हणे , "नंदरबार ना गम जायेल व्हतूत. हातोडा वाला रायसिंग भो , खोडगाव ना दीपा भो बी संगे व्हतात. धना भो आमना कानमा दिसन सुरत ना गम नयकी जायेल व्हतात , नि जगू भो नि एन टेम ले उच्चे बगले करी दिनात, नही ते या बठासले एक संगे लयी जावाना पिल्यानं व्हता कारभारीना !पण सकसेश नही व्हयना आमना पिल्यानं !!" 
तुंबालाल अप्पा म्हणे ,"आम्ले बी कदी मदी लयी जात जावा ! दखा कारभारी ,आऊ धना भो मोठा बेरकी शे, हम्मेस त्यानं त्यांनी फिराक मा रास ! आणि जगू भो न बी काय खरं नही ! खटा अप्पाबी हम्मेस बांड्या राग ली धरस!"
कारभारी म्हणे ," खरं शे तुमनं म्हणनं! सानू मास्तर बी दूर व्हयेल ना गत रास ! गुरु चेला नी अशी जोळी जमेल शे ते आपला काय याद यी! ऐकू अण्णा बी ध्यान देत नही. लोके ज्यानं त्यानं दुनिया मा मगम शेतस, रस्तावर भेटणात ते कोल्ला राम राम ठोकतस. काय खरं नही शे दुनियांनं !"
कारभारी आणि तुंबालाल अप्पा चावयी रायणतात तवसुंग जादू न्हानजी बी यि पडणात! राम राम शाम शाम व्हयनं तितलामा खयाना गमतुन जोरमा आवाज उणा ! इस्कुन्डा--फारदा--नारदा --पिलारदा --डू!
कारभारी म्हणे , ''आवण उजी डुकरे माती जायेल शेतस नहीत?"
जादू न्हानजी घाई काय रावायनं नही , "आयायायाया, म्हणे राजा ले दिवायी जशी माहीत नही ! कारभारी तुमे गावना गम फेरी टाकतस नहीत त्यामा तुमले कशी काय मालुंग पळी! डुकरे नही मातनात , ते त्या गताळीसले खावाळी--पेवाळी--न्हावाळी--- माताळी रायणात !आपला दानु शेठ नि डुक्रेस्ना फारम टाका ,आयी माहित नही तुमले?" 
कारभारी जोरमा हसनात ! कारभारी म्हणे , ''आम्ले माहिती नही ! बरं व्हयी गे , मांगला हफ्ता मा नानू भो पार्टीले बलाई रायणतात , पण आमेन सांग कि आमनं बंद शे ! बरं व्हयनं भोस्वन, आमेन गवुत नहीत. या चालू दानु शेठनं काही सांगता येत नही ! दानु शेठ भी उद्योगी शेतस ! कवय कुट्टी ना कट्टा , कवय इट ना भट्टा नी आते खुशाल डुक्रेस्ना वट्टा ! या काय काय कुट्टा करतीन नी या काय काय सट्टा लावतीन यांना नेम नही !" तुंबालाल अप्पानी पेपर मा कायतरी वाचं!
,'' कारभारी, आऊ पेपर दखा ! काय लिखेल शे ! कोणती तरी पार्टी वाला त्यास्ना जिल्हाना अध्यक्षसले कारपियो गाळी दि रायणात म्हणे !खरं शे का आयी ?"
कारभारी म्हणे , ''पेपर मा जर येयेल शे ते खरं व्हयी ! भागबली शेतस बिचारा ! त्यास्नी बी येवस्था लावणी पळी ना पार्टीले  ,आमेन आऊ इशय वर काय बोलतस नहीत. काय शे लोकेस्ले कारभारीना बोलेलना उजी चरका लागी उठस!!'' 
तुंबालाल अप्पा म्हणे , ''बय, आपुन काय पाप करेल शे कि आपुन जठे शेतस तठेच शेतस , उलटा हेटे चालणूत ! आपल्या वावण्या झिंजायी चालण्यात , पण आपली काय कोठे लाटरी लागत नही"
''आखो झेंडा धरा! झेंडा धरणारा ठायका रातीनं! गाड्या उडावणारा गाड्या उडावंतीन! आपुन आठेच सुतार ना मेट वर बिड्या फुकत बसा नही ते वाकळी चोया, तुमन्या कपाश्यासले भाव नही भेटावं , तुमना रस्तास्ना खड्डा नही बुजावात ," जादू न्हानजी बोलनात!
तुंबालाल अप्पा म्हणे, ''कारभारी ,आपुन बी आपली पार्टी काळूत !! ''
कारभारी जोर जोर मा हसनात. कारभारी म्हणे , ''अप्पा , आपुन पार्टी काळी , आपुनज आपला पैसावर आपली जाहिरात करानी म्हणजे आप्लाज पॆसास्नी गुलाल लिसन आपलाज आंगवर टाकाणी ! वाजा बी आपुन वाजाना नि नाचानं बी आपुन ! अशा खे व्हयी जाई ! चांगला चांगला असामीसन्या पार्ट्या टिकण्यात नहीत तवय आपला कथा टाया शे ? बाकिन्या डझनभर छटाक छुटाक पार्ट्यासनी मान्यता काळी टाकेल शे निवळनुक आयोग नि ! आऊ काय सादा खे नही शे भो ! आऊ येळा व्हवांना खे शे ! आपुनले काय परवडावं नही ! आपुन खुशाल आठेज मारतीना पार वर बसानं आणि खुशाल सोपाऱ्या फ़ोडान्या ! 
काय मंडई , खोटं शे का? खोटं व्हयी ते परत !"
लेखक @ आपलाच दोस्तार : जयपाल सर , शिरपूर

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...