कारभारी आणि तुंबालाल अप्पा आज एकजोगे बशेल व्हतात.
अप्पा म्हणे , "कारभारी , आते वल्ला वल्ला गुजरात तुन उनात नि आखो काल्दीनं कथा गयथात ?"
कारभारी म्हणे , "नंदरबार ना गम जायेल व्हतूत. हातोडा वाला रायसिंग भो , खोडगाव ना दीपा भो बी संगे व्हतात. धना भो आमना कानमा दिसन सुरत ना गम नयकी जायेल व्हतात , नि जगू भो नि एन टेम ले उच्चे बगले करी दिनात, नही ते या बठासले एक संगे लयी जावाना पिल्यानं व्हता कारभारीना !पण सकसेश नही व्हयना आमना पिल्यानं !!"
तुंबालाल अप्पा म्हणे ,"आम्ले बी कदी मदी लयी जात जावा ! दखा कारभारी ,आऊ धना भो मोठा बेरकी शे, हम्मेस त्यानं त्यांनी फिराक मा रास ! आणि जगू भो न बी काय खरं नही ! खटा अप्पाबी हम्मेस बांड्या राग ली धरस!"
कारभारी म्हणे ," खरं शे तुमनं म्हणनं! सानू मास्तर बी दूर व्हयेल ना गत रास ! गुरु चेला नी अशी जोळी जमेल शे ते आपला काय याद यी! ऐकू अण्णा बी ध्यान देत नही. लोके ज्यानं त्यानं दुनिया मा मगम शेतस, रस्तावर भेटणात ते कोल्ला राम राम ठोकतस. काय खरं नही शे दुनियांनं !"
कारभारी आणि तुंबालाल अप्पा चावयी रायणतात तवसुंग जादू न्हानजी बी यि पडणात! राम राम शाम शाम व्हयनं तितलामा खयाना गमतुन जोरमा आवाज उणा ! इस्कुन्डा--फारदा--नारदा --पिलारदा --डू!
कारभारी म्हणे , ''आवण उजी डुकरे माती जायेल शेतस नहीत?"
जादू न्हानजी घाई काय रावायनं नही , "आयायायाया, म्हणे राजा ले दिवायी जशी माहीत नही ! कारभारी तुमे गावना गम फेरी टाकतस नहीत त्यामा तुमले कशी काय मालुंग पळी! डुकरे नही मातनात , ते त्या गताळीसले खावाळी--पेवाळी--न्हावाळी--- माताळी रायणात !आपला दानु शेठ नि डुक्रेस्ना फारम टाका ,आयी माहित नही तुमले?"
कारभारी जोरमा हसनात ! कारभारी म्हणे , ''आम्ले माहिती नही ! बरं व्हयी गे , मांगला हफ्ता मा नानू भो पार्टीले बलाई रायणतात , पण आमेन सांग कि आमनं बंद शे ! बरं व्हयनं भोस्वन, आमेन गवुत नहीत. या चालू दानु शेठनं काही सांगता येत नही ! दानु शेठ भी उद्योगी शेतस ! कवय कुट्टी ना कट्टा , कवय इट ना भट्टा नी आते खुशाल डुक्रेस्ना वट्टा ! या काय काय कुट्टा करतीन नी या काय काय सट्टा लावतीन यांना नेम नही !" तुंबालाल अप्पानी पेपर मा कायतरी वाचं!
,'' कारभारी, आऊ पेपर दखा ! काय लिखेल शे ! कोणती तरी पार्टी वाला त्यास्ना जिल्हाना अध्यक्षसले कारपियो गाळी दि रायणात म्हणे !खरं शे का आयी ?"
कारभारी म्हणे , ''पेपर मा जर येयेल शे ते खरं व्हयी ! भागबली शेतस बिचारा ! त्यास्नी बी येवस्था लावणी पळी ना पार्टीले ,आमेन आऊ इशय वर काय बोलतस नहीत. काय शे लोकेस्ले कारभारीना बोलेलना उजी चरका लागी उठस!!''
तुंबालाल अप्पा म्हणे , ''बय, आपुन काय पाप करेल शे कि आपुन जठे शेतस तठेच शेतस , उलटा हेटे चालणूत ! आपल्या वावण्या झिंजायी चालण्यात , पण आपली काय कोठे लाटरी लागत नही"
''आखो झेंडा धरा! झेंडा धरणारा ठायका रातीनं! गाड्या उडावणारा गाड्या उडावंतीन! आपुन आठेच सुतार ना मेट वर बिड्या फुकत बसा नही ते वाकळी चोया, तुमन्या कपाश्यासले भाव नही भेटावं , तुमना रस्तास्ना खड्डा नही बुजावात ," जादू न्हानजी बोलनात!
तुंबालाल अप्पा म्हणे, ''कारभारी ,आपुन बी आपली पार्टी काळूत !! ''
कारभारी जोर जोर मा हसनात. कारभारी म्हणे , ''अप्पा , आपुन पार्टी काळी , आपुनज आपला पैसावर आपली जाहिरात करानी म्हणजे आप्लाज पॆसास्नी गुलाल लिसन आपलाज आंगवर टाकाणी ! वाजा बी आपुन वाजाना नि नाचानं बी आपुन ! अशा खे व्हयी जाई ! चांगला चांगला असामीसन्या पार्ट्या टिकण्यात नहीत तवय आपला कथा टाया शे ? बाकिन्या डझनभर छटाक छुटाक पार्ट्यासनी मान्यता काळी टाकेल शे निवळनुक आयोग नि ! आऊ काय सादा खे नही शे भो ! आऊ येळा व्हवांना खे शे ! आपुनले काय परवडावं नही ! आपुन खुशाल आठेज मारतीना पार वर बसानं आणि खुशाल सोपाऱ्या फ़ोडान्या !
काय मंडई , खोटं शे का? खोटं व्हयी ते परत !"
लेखक @ आपलाच दोस्तार : जयपाल सर , शिरपूर

No comments:
Post a Comment